खूप दिवसांपासून डोक्यात
होतं
की
वालचंद
कॉलेज
आँफ
इंजिनिअरिंगमधे शिक्षक म्हणून ज्या
कालावधीत
काम
केलं,शिकवलं
त्यावर
काही
लिहावं.
पण
लिहायचा
प्रचंड
आळस!
मधे
मग
voice recording करून ठेवायचा पण
प्रयत्न
केला
आणि
सोडून
दिला.
१३
नोव्हेंबर
२०१९
ला
वालचंदमधे
राजीनामा
दिला
त्यानंतरच्या
एक
महिन्याच्या
Notice period मधे परत एकदा
सुरुवात
केली
आणि
...... जाऊदे
.
गेले ३ आठवडे कोरोनामुळे स्थानबद्धाता नशिबात आली. कालच काही जुन्या विद्यार्थीमित्रांबरोबर whatsapp गप्पा मारताना परत एकदा वाटलं की आता अजून ३ आठवडे आहेत तर परत प्रयत्न करून पहावा. आज सुरुवात तरी करतोय, रोज नियमितपणे लिहित राहीन इतका consistent तर मी आजिबात नाही,अशा लिखाणाच्या बाबतीत..बघूया पुढचं पुढं, आज सुरुवात तर केलीय.
ह्या सगळ्या लिखाणाला काय नाव द्यावं असा विचार करत असताना "Walchand Diaries" असं नाव सुचलं आणि ते समर्पक सुद्धा होईल असं वाटलं. कारण जे काही लिहिणार ते Walchand College संदर्भातच आणि मी अनुभवलेलं तेवढंच, ऐकीव काही नाही. अर्थात तारीख, वार वगैरे तपशील आणि कालानुक्रम (chronological order) ह्यात फरक पडेल. पण ते तितकसं महत्त्वाचं नाही. ते ते प्रसंग, घटना मला कशा दिसल्या, मी काय विचार केला, कसा react झालो ह्याचं एक चित्रण!
वालचंदमधेच शिकवायला यायचं असं काही कधी ठरलेलं नव्हतं. पण ज्ञानप्रबोधिनीमधे अनेक उत्तम शिक्षक मिळाले आणि आपणही शिक्षक व्हावं असं तेव्हाच शालेय वयात वाटायला लागलेलं होतं. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना सांगलीत १० वीच्या मुलांना NTSE साठी शिकवायला सुरुवात केली तेंव्हा जाणवायला लागलं की जमतंय आपल्याला शिकवायला. तेंव्हाच्या विद्यार्थ्यांनी पण परीक्षेत चांगलं यश मिळवलं. हा सगळा खटाटोप ३ वर्ष सुरु होता. त्यावेळचे विद्यार्थी.. नव्हे मित्रच म्हणायला पाहिजे खरंतर, कारण वयातला फरक ४-५-६ वर्षाचा फक्त, आजही संपर्कात आहेत. पुढे टाटा मोटर्समधे असताना गुरुवारी सुट्टी असायची. त्यादिवशी मग ज्ञानप्रबोधिनीमधल्या ८ वीच्या मुलांना शिकवायला जायचो. हे सगळं असलं तरी मी ऐक हौशी शिक्षक होतो. शिक्षकी पेशा स्वीकारावा असा कधी विचार नव्हता केलेला.
जानेवारी-फेब्रुवारी २००८ मध्ये सहज कॉलेजमधे गेलेलो असताना कळलं की कॉलेज आता autonomous होतय आणि कायमतत्वावर शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरु होणार आहे. तिथून डोक्यात विचार सुरु झाले. टाटा मधे पण तीन वर्ष पूर्ण होणार होती. मे २००८ मधे जाहिरात, सरकारी गतीनं ऑक्टोबरमधे मुलाखत आणि डिसेंबर अखेरीला निकाल हे सगळे सोपास्कार पार पडले. मुलाखतीच्या वेळी ऐक-दोनदा असं वाटलं की आपण भलतीकडेच आलोय. आलेला प्रत्येकजण फक्त salary, increment, fixation हीच भाषा बोलत होता. माझ्या मुलाखतीच्या दरम्यान पण हा विषय निघाला होता कारण बाहेरच्या चांगल्या मोठ्या कंपनीमधून आलेला मी एकटाच होतो. असो !
२९-३० डिसेंबरला appointment letter मिळालं, मग टाटामधला १ महिन्याचा notice period संपवून अखेर ५ फेब्रुवारीला वालचंदमधे दाखल झालो. नवीन नोकरीची सुरुवात. पहिली नोकरी टाटा मोटर्स ची पण तिथलं selection IIT च्या campus placement मधून झालेलं. So it was just out of compulsion. अर्थात तीही साडेतीन वर्षं मी enjoy केलीच होती. पण वालचंद ची नोकरी ही by choice प्रकारात मोडणारी. त्यामुळे पुरेसं दडपण. त्यात परत टाटा सोडून वालचंद हा तसा अनेकांच्या मते शुद्ध वेडेपणा!
त्यातल्या त्यात जमेची बाब इतकीच की विद्यार्थी म्हणून ह्या campus मधे ४ वर्ष काढलेली होती. अर्थात त्यावेळी किती दिवस प्रत्यक्ष college मधे आणि वर्गात असायचो? जाऊदे चर्चा न केलेलीच बरी. पण तरी शेवटी विद्यार्थी म्हणून वावरणं आणि शिक्षक म्हणून ह्यात खूप फरक पडतोच.
पूर्णवेळ शिक्षक होत असताना नेमकं काय साध्य करायचय असा काही विचार केलेला नव्हता. अनेक आवडत्या शिक्षकांप्रमाणे वर्गात उत्त्तम शिकवता आलं पाहिजे, अभ्यासक्रमाबरोबरच त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी सांगता आल्या पाहिजेत, वर्गाबाहेर आपला थोडा दरारा वाटला पाहिजे अश्या साध्या अपेक्षा ठेवल्या होत्या. पण पुण्यातल्या नोकरीतून मोकळा झाल्यावर सांगलीला जाण्यापूर्वी ज्ञानप्रबोधिनीचे संचालक आदरणीय गिरीशराव बापट (सध्याचे खाजदार गिरीश बापट वेगळे बरं का) ह्यांना भेटायला गेलेलो. त्यावेळी ते म्हणाले कि "सध्या तू चांगला trainer आहेसच. आता चांगला teacher व्हायचा प्रयत्न कर." ह्याचा अर्थ समजायला पुढे बरीच वर्षं जावी लागली.
पण इकडे वालचंदमधे वेगळेच आणि अनपेक्षित स्वागत झाले. पहिले मानकरी अर्थातच त्यावेळचे विभागप्रमुख खिरे सर. पहिलंच वाक्य काय तर “तू आज join होतो आहेस हे माहिती होतं पण तुझ्या बसण्याच्या जागेचा काही विचार केलेला नाहीये. तूच department मधे बघ कुठे बसण्यायोग्य जागा मिळतीय का“, छान !
'अस्ताव्यस्त पसरलेल्या वालचंद mechanical department मधे जागा शोधणं किंवा मिळवणं हे काम पहिल्या काही दिवसात जो करू शकतो बहुधा तोच पुढे इथे survive होऊ शकतो' हे MYK नी न म्हटलेलं वाक्य समजून घेऊन बाहेर पडलो.
Joining formalities पूर्ण करायला मग मोर्चा office कडे वळवला. तिथे तर आत येणाऱ्याविरुद्ध जणू मोर्चेबांधणीच केलेली. ह्या office मधे establishment section नावाचा एक विभाग आहे. कॉलेजमधे कोणालाही establish होऊ द्यायचं नाही हे त्यांचं काम. अर्थात हे कळायला ५-६ वर्ष जावी लागतात. कारण तोपर्यंत प्रत्येकाला आशा असते की आपण आज ना उद्या इथे स्थिरस्थावर होऊ.
तर अशा ह्या establishment section च्या श्री. माळी ह्यांच्यासमोर सर्व कागदपत्र घेऊन उभा राहिलो. सगळ्या कागदपत्रांची छाननी (हा छाननी शब्द कुठून तयार झाला हे त्या दिवशी कळले. कुठलाही कागद छान नाही, छान नाही म्हणायची प्रक्रिया म्हणजे छाननी!) पूर्ण झाल्यावर परत एकदा १०वी - १२वी च्या गुणपत्रिका घेऊन ते काहीतरी शोधू लागले. मी आपला संशयित आरोप्यासारखा उभा. उगीच आपलं “माझी १०वी CBSE बोर्डमधून झालीये त्यामुळे मार्कलिस्ट वेगळी वाटेल तुम्हाला“ असं काहीतरी सांगायचा प्रयत्न केला. पण प्रकरण वेगळच होतं. CBSE च्या कृपेने १०वी आणि मग १२वी मधे पण मराठी व हिंदी हे विषय माझे नव्हते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या नियमाप्रमाणे मराठी व हिंदीची १०वी ची परीक्षा मला येत्या २ वर्षात द्यावी लागेल, इति तात्पर्य. आता Engg college मधे लेक्चरर म्हणून काम करायला मराठी किंवा हिंदी का लागते? पण असे प्रश्न सरकार दरबारी विचारायचे नसतात. आता ही परीक्षा कोण घेतं, कधी घेतं, त्याला कसं apply करायचं ह्या असल्या प्रश्नांना एकच रामबाण उत्तर माळीसाहेबांनी दिलं. ते म्हणजे “संबंधित GR शोधा. त्यात सगळे तपशील मिळतील“ GR नावाच्या ह्या सवंगड्याची पुढे आपल्याला वारंवार मदत लागणार आहे त्याची ही नांदी होती बहुधा.
एवढ्यावर सुटका झाली नाही माझी. “तुम्हाला MSCIT ची परीक्षा पण द्यावी लागेल” ह्या वाक्यानी माळी साहेबांनी आपलं आणखीन एक शस्त्र बाहेर काढलं. Excel, powerpoint, word वगैरे computer मधल्या basic गोष्टींची ही परीक्षा. IIT मधून MTech करत असताना हे असलं काही शिकवत नसावेत असं सरकारला वाटत असावं बहुधा! एकंदर काय आणखीन एक परीक्षा द्यावी लागणार तर!
"आणखी काही?" मीच आपणहून विचारलं. "बाकी सगळं आहे तुमचं. फक्त civil surgeon चं medical fitness certificate आणि पोलिसाकडून character certificate घेऊन तेवढं जमा करा. घाई नाही ४-६ महिन्यात केलं तरी चालेल” ह्या शेवटच्या वाक्याने पुरता गारद होऊन मी office मधून बाहेर पडलो .
पण मनाशी निश्चय केला की ह्या सगळ्यामुळे डोकं चक्रावून जाण्यापूर्वी medical fitness certificate आणि वालचंद मधल्या हवेने character मधे आंतर्बाह्य बदल होण्यापूर्वी character certificate मिळवावं हे इष्ट !
लहानपणी रामायण-महाभारत खूपदा पाहिलेलं असल्याने प्रत्येक शापाला उ:शाप असतोच हे पक्क माहित होतं. त्यामुळे मराठी-हिंदी-MSCIT वगैरे शापांना काहीतरी उ:शाप मिळावा म्हणून माझे पाय आपसूकच गणपती मंदिराकडे वळले .
(गणरायाने कोणता उ:शाप सांगितला आणि ह्या सगळ्याला मी नंतर कसा सामोरा गेलो ह्याची कथा पुन्हा केव्हातरी)
अमर परांजपे

छान लिहिलंय सर. पुढच्या लेखाची वाट पाहतोय.
ReplyDeleteसगळे लेख अपलोड करा लवकर
ReplyDeleteवा!
ReplyDeleteइथे सगळीकडे पॅकेजची भाषा असताना,हा निर्णय घेणं तुमचं हेच वेगळेपण आहे.
ReplyDeleteखूप सुंदर प्रवास लिहलय सर. पुढे काय झालं या लेखाची वाट पाहतोय.
ReplyDeleteमस्त लिहिले आहे. तुम्ही प्रत्यक्ष सांगत असल्याची अनुभुती आली
ReplyDeleteKhup Chhan sir.... Pudhachya lekhachi aata waat pahavi lagel.... 🙏🙏🙏
ReplyDeleteमस्त लिहिलंय सर !! पुढील भागाच्या प्रतीक्षेत...
ReplyDeleteअप्रतीम लेखन!
ReplyDeleteअनुभव समृद्ध!
सरकार दरबार चे कारभार खच्चीकरण करणारे....तरी बरीच वर्षं चिकाटी दाखवलीत...कौतुक करावं तेवढं थोडं..
उशाप कथा ऐकयची उत्सुकता आहे..
Khup chhan sir
ReplyDeleteSuperb Sir...👌👌👌
ReplyDeleteWaiting for next part..🤩
Khup bhari lihily sir government madhe job suru kartana kay documents cha kam ast ani kiti level parynt ast he pn kalal.
ReplyDeletePudchya lekhachi vat bagtoy..
Mast lihily sir...pudhcha lekh lavkr upload kara
ReplyDeleteChan lihla ahe sir ! As a student tar amhala Walchand cha experience ahech, pan Walchand che professor mhanun kay anubhav yet astat he tumchya blog madhun experience karayla milel amhala. I hope ki pudhcha blog lavkarach vachayla milel ��
ReplyDeleteVery Nice sir..
ReplyDeleteसर खूप मस्त👌
ReplyDeleteWaiting for next part 😊
Mast lihilay sir. Eagerly waiting for the upcoming articles. #nostalgic.
ReplyDelete- Sagar Pawar
2007-11
👌👌👌
ReplyDeleteछान लिखाण. उत्कंठा वर्धक.
ReplyDeleteKhupach Chan Sir.
ReplyDeleteEagerly waiting for the next part
Chan sir. ..
ReplyDeleteLoved it!! You are great sir and always will be!
ReplyDeleteखूप छान लिहिलंय सर तुमच्या लेखनातून आम्हाला पण प्रेरणा मिळत आहे. वाचून खूप भारी वाटले सर
ReplyDeleteसुंदर लिखाण आणि सुंदर मांडणीसुद्धा! पुढचा लेख वाचायला आम्ही सर्वजणच उत्सुक आहोत, सर. नक्की लिहा!!
ReplyDeleteउत्तर मिळणार बहुतेक 😉
ReplyDeleteA great utilization of lockdown.Waiting for Upcoming Blog
ReplyDelete😊
मस्त अमर. नक्की लिही रोज. मी आठवण करीन. शुभेच्छा.
ReplyDeletePudhcha bhag patkan post kara sir. Ghri basun college madhe aslyacha bhas zala.
ReplyDeleteEkach number
ReplyDeleteमस्तच Sir! Waiting for the next one.
ReplyDeleteNice to read sir
ReplyDeleteWait for next article
खूपच छान सर
ReplyDeleteVery nice amar
ReplyDeleteखुप छान सर...👌👌
ReplyDeleteVery Nice, Sir
ReplyDeleteदमदार लेखन, वालचंद इकोसिस्टम वर अचूक भाष्य
ReplyDeleteगम्मत येणार पुढचे वाचायला
अनंत
Deleteखूपच छान सर. वाचत असताना ती वर्षे सहजच डोळ्यासमोरून निघून गेली. Teacher's point of view मधुन कधी विचार केला न्हवता. Now, we're almost of the same age as you were when you joined WCE, but I sincerely doubt that anyone of us even has half of the depth, maturity or the calmness that you had back then. तुम्ही टीचींग मधून का बाहेर पडलात हे अजून तरी मला माहित नाही, पण upcoming students साठी हा खरच मोठा तोटा आहे.
ReplyDeleteतुमच्या बद्दलची आदरयुक्त भीती अजून ही मनात आहे त्यामुळे सांगलीला मी बऱ्याच वेळा येऊन गेलो पण तुम्हाला फेस करण्याचं धाडस नाही जमवू शकलो.
पुढचा ब्लॉग लवकरच वाचायला मिळेल अशी आशा करतो.
This comment has been removed by the author.
ReplyDeleteGood reads!! please continue sharing more. (it is always nice to see lighter side of the incidents & move on without forgetting the teachings of the experience)
ReplyDeleteखूपच मुद्देसूद लिखाण जसे काही आत्ता आत्ता घडत आहे व रोजनिशी लिहावी त्या प्रमाणे नोंदी आहेत पुढचा प्रवास पण आवडेल वाचायला
ReplyDeleteतुमच्या लिखाणाची एक तोंडओळख झालीच होती याआधी, तरीही पुन्हा एकदा इतक्या स्पष्ट आणि सुरेख लेखणीच कौतुक केल्या शिवाय राहवत नाही...कदाचित तुमच्या पहिल्या दिवशी तुम्हाला या गोष्टीची कल्पना नसेल की तुम्ही पुढे किती जणांच्या जडणघडणीचा महत्त्वाचा भाग बनणार आहात...Proud to be your student and friend...
ReplyDeleteMastach Lihilay Sir !!!
ReplyDeleteShows the real attachment you had with your teaching passion. Walchand is one of the destinations in journey. Thanks for sharing...
ReplyDeleteतीन ही ब्लॉग खुप छान...गणपती उशाप ऐकायचा आहे ...
ReplyDeleteEnjoyed ! My novel on four years at WCE was published way back in 1998. ( I was in WCE during 1977-1981). Which batch you belong to? Mr. Khire was junior faculty that time. All the best ! I got this from my wife's WA group.
ReplyDeleteMastch Amar! Aaj vachayala vel milala shevati.
ReplyDeleteAmar, farach mast lihito ahes. You are able to recreate the situations beautifully with your words. Though I have never been in Walchand College, can imagine the typical government and engineering college atmosphere :) And most importantly, the ability to stay positive and do good in the interest of the students is amazing. Keep it going :) and enjoy teaching :)
ReplyDeleteNow u don't go to Walchand college? I am unaware.
ReplyDeleteThis is such a wonderful writing sir!! Your words are bound to take me back to my college days.
ReplyDeleteRahul Kabadagi here.
DeleteVery nice. I could visualise the scene.
ReplyDeleteफारच भारी रे दादा.... मस्त लिहितोस....
ReplyDelete