शीर्षक वाचून चक्रावलात ना? पु.लं.नी ‘असामी असामी’ मध्ये म्हटले आहे बघा की शिक्षक हा
चांगला नट असावा लागतो. मग एकदा नट म्हटलं की वेषभूषा आणि भूमिकेला अनुसरून
वेषांतर हे ओघाने आलंच, नाही का??
सध्याच्या
lockdown च्या काळात अनेकांना वर्क फ्रॉम होम करावं लागतंय.
अनेकांना video conferencing द्वारे meeting
मध्ये सहभागी व्हावं लागतंय. त्यावेळी वर्कचा ड्रेस की होमचा ड्रेस
अशी द्विधा मनस्थिती होताना दिसते. व्हाट्सअप वर आलेल्या काही फोटोत एक माणूस वरती ब्लेझर वगैरे घालून मिटिंग अटेंड करतोय पण खाली बर्मुडा
घातली आहे ..असे फोटो पण तुम्ही बघितले असतील . या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर
माझ्या वेषभूषेचा प्रवास वालचंद मध्ये कसा झाला याविषयी थोडेसे.
टाटा मोटर्समध्ये रोजच निळी पॅन्ट, पांढरा शर्ट,
पायात बूट असा फॉर्मल ड्रेस घालायची सवय झालेली होती. वालचंद मध्ये
पहिल्या दिवशी पण साधारण तशाच पोशाखात गेलो .पांढऱ्या शर्टच्या ऐवजी फक्त दुसरा
रंगीत फॉर्मल शर्ट होता. पहिल्याच भेटीत विभाग प्रमुखांनी आपादमस्तक न्याहाळून
पसंतीची मोहोर उमटवलेली असल्याने पुढे पण असाच पोशाख करून कॉलेजला जात राहिलो.
पण
हळूहळू फॉर्मल ड्रेस मधला औपचारिकपणा त्रास द्यायला लागला. मूळचा बंडखोर स्वभावही
डोके वर काढायला लागला. असाच पोशाख करायला पाहिजे असा नियम आहे का? उन्हाळ्यात पण बूट घातलेच पाहिजेत का? असे प्रश्न
पडायला लागले. योग्य पोशाख कोणता? तर प्रसंगाला साजेसा आणि
घालणाऱ्याच्या सोयीचा! आता कॉलेजमध्ये शिक्षकाला वर्गात शिकवण्याचा प्रसंग रोजच
येतो. त्याला साजेसा पोशाख कोणता, याविषयी बरीच मतमतांतरे
माझ्याही मनात होती. पण बदल करावा कसा? कारण कडक पोषाखामधले
आणि बुटांचा खाडखाड आवाज करत ताठ मानेने कॉरिडॉरच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत
जाणारे आणि अगदी विद्यार्थ्यांनी पण कॉलेजला तसेच यावे अशी अपेक्षा बाळगणारे विभाग
प्रमुख स्वभावाने पण पुरेसे कडक होते. But change is constant! हळूहळू बदल व्हायला सुरुवात झाली. कधीतरी पायाला लागायचं निमित्त झालं आणि
बुटांची जागा चपलेने घेतली. पुढे जखम बरी झाली पण बुट फक्त इंडस्ट्रियल
व्हिजिटच्या वेळी कपाटातून बाहेर पडायला लागले.
इन केलेला शर्ट पुढच्या उन्हाळ्यात आऊट झाला आणि त्याबरोबरच मग बेल्टही गायब झाला. मधल्या काळात व्यक्तिमत्त्वाला, शिक्षकी पेशाला साजेसे 'वजन' प्राप्त झाल्यामुळे बेल्टची तशी गरज उरली नव्हती. एकदा बाहेर निवांत जगायची सवय झालेला आऊट-शर्ट नंतर कधी कुठल्या बंधनात अडकला नाही. अनेकांनी त्यावर पुरेशा कमेंट केल्या पण तरीही.
मधल्या काळात विभाग प्रमुख बदलले. "काय रे तुम्ही हल्लीची मुलं चट्टेरी पट्टेरी कपडे घालता", अशा त्यांच्या कमेंटवर "काळ बदलला आहे सर. आता आपणही बदलायला पाहिजे." असे उत्तर देण्याइतके बिनधास्त झालो. सुहास जगताप आमच्या कंपूमध्ये सामील झाल्यावर मग आम्ही कधीतरी टी-शर्ट पण वापरायला लागलो. एकंदर मी कपडे या बाबतीत थोडा गबाळाच आहे असे सौभाग्यवतींचं ठाम मत झालेलं. त्यामुळे "अरे जरा त्या अजित पाटील सरांसारखे राहत जा" अशी तिची कमेंट आणि ऑफिशियल ऑनलाइन फीडबॅक मध्ये "सर, जरा ब्राईट कलरचे कपडे वापरा" अशी आलेली कमेंट...दोन्ही बाजूला सरकवून देण्याइतका मी स्थितप्रज्ञ झालो होतो. त्यानंतरच्या काळात विद्यार्थ्यांचे लक्ष माझ्या कपड्यांपेक्षा शिकवण्याकडे जास्त राहील याची जास्त खबरदारी घेत राहिलो.

consultancy करायला सुरुवात केल्यावर साखर कारखान्यात घालायचे कपडे हा एक वेगळाच विषय
झाला होता. कारण ग्रीसचा कधीकधी अक्षरशः फवारा उडायचा. त्यात भरीला bagas. त्यामुळे इथे घालायचे कपडे वेगळे ठेवायला सुरुवात केली. ते कपडे घरात काय
अगदी गाडीत बसतानासुद्धा घालायच्या लायकीचे नसायचे. कारखाना जवळ आला की गाडी
बाजूला लावून कपडे बदलायचे आणि परत येताना बाहेर पडल्यावर परत नेहमीचे कपडे
घालायचे असा शिरस्ता पाडला.
एकदा
गंमत झाली. मंगळवेढ्याच्या 'संत दामाजी' साखर कारखान्याला जायला मी आणि चव्हाण
सर निघालो. मंगळवेढा गाव ओलांडल्यावर पुढे सोलापूर
रस्ता सोडून कारखान्याकडे वळलो आणि एका झाडाखाली कपडे बदलायला थांबलो. भर दुपारी
दोनची वेळ. टळटळीत ऊन. कपडे बदलून परत गाडीत बसलो पण गाडी सुरूच होईना. आता काय
करावं, धक्का देऊन बघावा का वगैरे चर्चा करत होतो. हा सगळा
प्रकार रस्त्यावरून येणारे एक म्हातारबाबा बघत होते. हळूहळू चालत आमच्याजवळ आले.
सगळी परिस्थिती बघून म्हणाले, "कापडं बदललीसा नव्हं.
गाडीला ही मळकी कापडं पसंत नाहीत जनू. आधीची स्वच्छ कापडंच शोभून दिसतात बगा.” लोकं, कपडे
आणि काम यात गल्लत करतात. हेच तर त्याला सुचवायचं नव्हतं? मालकाच्या
पोशाखाबाबत माझ्या गाडीचं पण मत तयार होत होतं की काय? म्हणून
तर कारखान्याचे ग्रीसचे कपडे घातल्यावर ती सुरूच होईना.
मंगळवेढ्याच्या त्या म्हातारबाबांना
कळलेली कपड्यांबाबतची ही philosophy
सगळ्यांना कळती तर !
अमर परांजपे
(प्रत्यक्ष वर्गात शिकवायला चालू केलं
तेव्हाचे काही अनुभव पुढील भागात)
Chhan lihilay sir!
ReplyDeleteSir tumchyasathi 'simplicity is the style' हे खरं ठरतं. छान लिहीले.
ReplyDeleteसाधी राहणी उच्च विचारसरणी आहे तुमची सर.
ReplyDelete👌👌
ReplyDeleteWaiting for next sir!
Awaiting for next blog sir.......
ReplyDeleteChange is constant
ReplyDeleteछान लिहलय. मला असेच वाटत होते कि इन शर्ट का करत नाही.त्याचे उत्तर आता समजले. सर तुम्ही Facebook वर या म्ह बर्याच जणांना वाचता येईल
ReplyDeleteSuper
ReplyDeleteछान सर
ReplyDeleteछान लिहलय सर
ReplyDeleteएक एक गोष्ट उलगडत जाते असे वाटते
ReplyDeleteसर... तो फीडबॅक २०१५ बॅच चा नसावा अशी अपेक्षा करतो.. 😅
ReplyDeleteतेव्हा कुठे पडलेल्या प्रश्र्नांची उत्तरे आज भेटतात...what a simple living and great thinking sir..😊
ReplyDeleteछान अमर... मजा येतेय वाचायला...
ReplyDeleteचालू ठेव.... विवेक सर, सविता ताई
मस्त लिहीलयं सर... तुम्ही मुलांचे सर्वात आवडते शिक्षक असायचा. त्यामुळे मुलं तरी कपडे पाहून जज करतात असं वाटत नाही... 😝
ReplyDelete👌
ReplyDeleteGood write up, keep it up
ReplyDeleteMast lihit aahes Amar , aani walchand madhale tuze anuvbhav mhanun vachayla aankhi interesting aahet.
ReplyDeleteBest.... पोशाख हा मुद्दा आहेच पण....
ReplyDelete