ज्या दिवशी वालचंद मधे दाखल झालो त्याच्या दुसऱ्या दिवशीच
मला माझं वेळापत्रक हातात मिळालं, आणि ते पाहून मी चक्रावूनच गेलो. Graphics पासून ते machine design पर्यंत आणि workshop पासून power plant engg पर्यंत वेगवेगळ्या सहा विषयांची practical त्यात होती. आता विचार करा कि नवीन
आलेल्या शिक्षकाला एकदम ६ विषय दिले तर काय परिस्थिती उद्भवेल. त्यातले काही विषय
तर मी कधी शिकलेले पण नव्हते. त्यामुळे प्रत्येक practical ला जाताना कशीबशी किंवा कशीतरी तयारी करून
जायला लागायचं. सुरवातीला तर विचार करायला पण फुरसत नव्हती पण थोडे दिवसांनी जरा
विचार करायला लागलो कि हे असं वेळापत्रक का केलं असेल. थोडी चौकशी करता असं कळलं
कि मी यायच्या आदल्याच दिवशी तासिका तत्वावर काम करणारे एक शिक्षक सोडून गेले होते
आणि त्यांचं वेळापत्रक जसच्या तसं मला दिलं होतं ! पण त्या तासिका तत्वावर काम
करणाऱ्या शिक्षकाला तरी असं वेळापत्रक का दिलं होतं हा पण प्रश्न वेगळाच! त्यानंतर
पण २ सेमेस्टर मधे असेच वेळापत्रक मिळत राहिले. तक्रार केल्यावर “मोठा विभाग आहे. वेळापत्रक करताना अडचणी
असतात. वेगवेगळ्या विषयांची practical तर आहेत ना.. घेता येत नाहीत का तेवढी“ अशी उत्तरे मिळाली. वेळापत्रक करायचे
म्हणजे एक jigsaw puzzle सोडवण्यासारखा प्रकार. पण इथे वेळापत्रक करणाऱ्यांना हे कोडं सोडवताना नुसते
तुकडे जोडायचे असतात असं वाटत होतं. त्यातून एक मोठं चित्र पण तयार करायचं असतं हे
त्यांच्या खयालीच नव्हतं.
परत एकदा काही सूचना सांगायचा प्रयत्न केला तेव्हा मग “एवढचं असेल तर तुम्ही करून दाखवा“ असं आव्हान मिळालं आणि अर्थात स्वीकारलं
सुद्धा ! तिथून पुढे २०१० -११ च्या पहिल्या सेमेस्टर पासून २०१४-१५ च्या पहिल्या
सेमेस्टरपर्यंत अशी ९ सेमेस्टर वेळापत्रक करायचं काम माझ्याकडे आलं. वेळापत्रक हे
खरंतर त्या त्या सेमेस्टरमधलं विभागाच्या शैक्षणिक कामाचं चित्र असतं. Blue chart च म्हणा ना.. अनेक अडचणी आणि मर्यादा
असतातच पण त्यातूनच मार्ग काढून हे वेळापत्रक सगळ्यांना सोयीचं होईल हे बघावं
लागतं.
सकाळी ८ चं लेक्चर कोणाला नको असायचं आणि त्यावरून बरेच वाद
पण व्हायचे. पण प्रा. जोशी, प्रा. गजेंद्रगडकर अशी सिनिअर मंडळी ८ चे तास घ्यायला उत्सुक असायची. तसेच
त्यावेळी bachelor असलेले प्रा. अजित पाटील ह्यांना पण सकाळी ८ ला यायला आवडायचं. कोणाला
जेवणाच्या सुट्टी नंतर चा तास नको असायचा तर कोणाला दुपारनंतर शिकावायाला आवडायचं.
एकदाच हे सगळं समजावून घेतलं आणि जास्तीत जास्त लोकांची सोय पाहिली कि मग जास्ती
अडचण येत नाही असं लक्षात आलं.
जशी शिक्षकांची सोय बघायची तशीच विद्यार्थ्यांची सुद्धा सोय
पाहायला पाहिजे. उदाहरणार्थ शुक्रवारी दुपारनंतर तास ठेवले नाहीत तर मुलांना घरी
जायला सोपं होतं. सुरुवातीच्या विभाग प्रमुखांनी अशा विचाराला पाठींबा दिला पण
डिपार्टमेंट मधे नंतर बदल झाले.. आणि मग शिक्षण प्रक्रिया सुलभ कशी होईल हे
बघण्यापेक्षा विद्यार्थ्यांना त्रास कसा द्यायचा हे पाहणारे विभाग प्रमुख आले आणि
मग... असो. २०१३ मधे वेळापत्रक समन्वयक असतानाचा एक प्रसंग – नुकतच सेमेस्टर सुरु झालेलं होतं. Practical साठी विद्यार्थ्यांच्या batches करून सूचना फलकावर लावल्या. थोड्याच वेळात
तिसऱ्या वर्षाला शिकणारी एक विद्यार्थिनी practical batch संबंधी अडचण घेऊन भेटायला आली. तिचा वर्ग
क्रमांक १९ आणि यावेळी पहिल्यांदाच तिला M2 बँच मिळाली होती. ती आणि तिची मैत्रीण (वर्ग क्रमांक ११)
मिरजेहून एकाच दुचाकीवर कॉलेजला यायच्या जायच्या. पण आता दोघींच्या batch वेगळ्या झाल्यामुळे ते शक्य होणार नव्हतं.
आणि त्यासाठी तिची मागणी होती कि batch बदलून M1 करून मिळावी. तिच्या मागणीतील सत्यता आणि प्रामाणिकता ,गरज तपासून मग तिला batch बदलून दिली. असे अनेक प्रसंग येत गेले. पण
ह्या सगळ्यातून नियम, समानता (uniformity), प्रत्येकाला विषयाची कमीतकमी विविधता असे system मधील भाग आणि शिक्षक , विद्यार्थ्यांची सोय हा माणुसकीचा भाग
यांची सांगड कशी घालायची याचं चांगलं प्रशिक्षण झालं. पुढे विद्यार्थ्यांबरोबर
अनेक स्पर्धात्मक प्रकल्प करताना याचा खूप उपयोग झाला.
प्रत्येक सत्रामध्ये शिक्षकांमध्ये विषयांचे वाटप हा अजून
एक गमतीचा भाग होता. त्याचा अनुभव पहिल्याच सत्रामध्ये आला. सत्र संपता संपता
प्रत्येक शिक्षकाकडून पुढील सत्रामध्ये कुठले विषय शिकवायला आवडतील असा choice घेतला जायचा. अर्थात प्रत्येकाला आपल्या
निवडीनुसार विषय मिळायचेच असे नाही आणि ते स्वाभाविक होते. विषयांचे हे वाटप
विभागामधील काही ज्येष्ठ प्राध्यापक बंद खोलीत करत असत. पहिल्याच सत्रामध्ये मला Metrology
Quality Control ( MCQ)आणि Operation
Research (OR )असे दोन वेगळेच
विषय मिळाले. अर्थातच मी विभाग प्रमुखांना भेटायला गेलो आणि विचारले कि “माझे specialisatiion Design असताना मला हे वेगळेच विषय कसे दिले गेले?” त्यांनी फार भन्नाट उत्तर दिले. ते
म्हणाले “हे बघ, विभागामध्ये सध्या तू सगळ्यात junior आहेस. हे दोन्ही विषय बाकी कोणाला नको
होते. त्यामुळे ते तुझ्या वाट्याला आले.” (हा अनुभव अनेक शाळा शिक्षकांनी पण घेतला असेल) आता याला काय
म्हणावे ? म्हणजे त्या त्या विषयामधला अनुभव किंवा क्षमता ह्यांचा विचार किंवा हा विषय
विद्यार्थ्यांपर्यंत कोण सगळ्यात उत्तम पोचवू शकेल अशा काही विचाराचा पूर्ण अभाव. Seniority हा काय विषय वाटपाचा criteria असू शकतो का? खरंतर अवघड विषय किंवा अन्य कोणी शिकवू शकणार नाही असे विषय
ज्येष्ठ शिक्षकांनी आपण होऊन घेतले पाहिजेत. पण विद्यार्थी हितापेक्षा स्वतःच्या
स्वार्थाला अधिक महत्त्व देणाऱ्यांना हे कसे कळणार?
नंतर च्या काळामध्ये विषय वाटपामध्ये एक चांगला बदल झाला तो
म्हणजे विषय वाटपाची चर्चा विभागातील सर्व शिक्षकांसमोर व्हायला लागली. आणि मग अशी
meeting हे प्रत्येक
सत्रातला करमणुकीचा भाग झाली. खरंच मजा यायची चर्चा ऐकायला, करायला..प्रत्येक जण आपल्याला हवा तो विषय
मिळावा ह्यासाठी झगडत असायचा. प्रथम वर्षाच्या graphics किंवा BME सारख्या विषयांना खूप मागणी असायची. तर Mechanical
System Design, Welding Technology वगैरे विषय घ्यायला कोणी तयार नसायचं. नवीन विषय शिकवायचा म्हणजे खूप अभ्यास
करावा लागतो त्यामुळे शक्यतो पूर्वी शिकवलेलेच विषय मिळावेत ह्यासाठी सगळ्यांची
धडपड असायची.
काही वेळा विभागप्रमुखांचा वेगळाच
agenda असायचा. काही
विषय हे ते शिकवणाऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थीप्रिय झालेले होते. उदाहरणार्थ
जगताप सरांचा IC Engines, आडमुठे सरांचा Metallurgy, पाटील सरांचा Dynamics of Machines, नाईक सरांचा Thermodynamics. मग ही विद्यार्थीप्रियता विभागप्रमुखांच्या डोळ्यावर यायची
आणि त्या शिक्षकाचा विषय जाणून बुजून बदलला जायचा. 'दुर्दैवाने' चांगले शिक्षक कुठलाही विषय उत्तमच शिकवतात. मी स्वतः २०१५ आणि २०१६ मधे machine design
II शिकवताना काही वेगळे आणि
अभिनव प्रयोग केले त्याचा उपयोग पण झाला (ह्या प्रयोगांविषयी नंतर कधीतरी सविस्तर
लिहीनच) आणि मग २०१७ मधे हा विषयच मला दिला गेला नाही. पण ह्या राजकारणामुळे
विद्यार्थ्यांचा तोटा होतो हे या वरिष्ठ मंडळींना कधी लक्षात आलं नाही किंवा विद्यार्थी
हिताला त्यांनी कधी प्राधान्य दिलं नाही.
एका विभागप्रमुखांनी एकदा अशी टूम
काढली कि ३ वर्ष एक विषय शिकवला कि सक्तीने विषय बदलायचा. हा तर विनोद होता. काही
अवघड विषय २-३ वेळा शिकवले कि थोडे थोडे कळायला लागतात. त्या नंतर शिकवायला जास्ती
मजा येते. पण त्या विभाग प्रमुखांना असले विचार कधी कळलेच नाहीत. कारण कुठलाच विषय
कधी मनापासून तयारी करून त्यांनी शिकवला नाही, आणि मग काही कीव वाटावी असे विनोद घडले. अख्या विभागात metallurgy मधे फक्त एकच expert शिक्षक तेंव्हा होते ...असं असताना त्या
शिक्षकाला तो विषय दिला नाही. कारण काय तर ३ वर्ष झाली म्हणे. खरी दुर्दैवाची
गोष्ट पुढंच आहे. हा बदल का केला गेला? ह्याचे खरे कारण काय ?ह्याचा आम्ही शोध घेत होतो. तर एका विशिष्ट विद्यार्थ्याला metallurgy विषयात पास करण्यासाठी metallury विषयात खरंच expert असलेल्या शिक्षकाला त्या विषयापासून दूर
केलं गेलं आणि तो विद्यार्थी पास झाल्यावर परत हा विषय त्या expert ,अभ्यासू शिक्षकाकडे दिला गेला. ह्या सारखे
दुसरे दुर्दैव ते काय.
दुसरा असाच वादग्रस्त आणि खूप
चर्चा झालेला मुद्दा म्हणजे, elective subjects चा. आता elective subject ठरवताना तो विषय कोण शिकवणार, त्या शिक्षकाचे नाव काय हे समजलं तर मुलं
त्यांची विषय निवड अधिक पक्की करू शकतात हे तर कुणाला पण समजेल..काँलेजमधे असताना
बरोबर कोण मित्र आहेत याचा जसा अभ्यासावर परिणाम होतो तसाच बरेचवेळा अमूक एक विषय
आवडायला किंवा नावडायला लागतो तो शिक्षकामुळे. हे तर अनेकजण मान्य करतात. असं
असताना elective subject पैकी कुठला विषय कोण शिकवणार म्हणजे त्या शिकवणाऱ्या शिक्षकाचं नाव सांगायचे
का नाही? नाव कळू द्यायचं नाही हे एक विशेष राजकारण मला कधी कळलंच नाही..खरंतर विषय
शिक्षक हा खूप महत्वाचा घटक आहे आणि जर विषय निवडण्याचे स्वातंत्र्य मुलांना
द्यायचे असेल तर विषयाच्या अभ्यासक्रमाइतकंच शिक्षक कोण ते माहिती असायला हवं. पण
ह्यालासुद्धा खूप लोकांनी (प्राध्यापकांनी )विरोध केला. खूप पाठपुरावा केल्यानंतर
२-३ सेमेस्टर शिक्षकांची नावं द्यायला सुरुवात झाली. पण... परत एकदा विभाग प्रमुख
बदलल्यावर ते बंद पडलं. एकीकडे विद्यार्थी केंद्रित शिक्षण प्रणाली असं म्हणत
असताना इतक्या basic गोष्टींमध्ये पण सतत स्वार्थ आणि राजकारण येत राहिलं.
प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम (syllabus) आणि त्यापूर्वी ४ वर्षांचा एकत्रित असा
पूर्ण ठाचा (structure) हा पूर्ण शैक्षणिक संस्थेचा कणा म्हणावा लागेल. २००८ मधे कॉलेजला स्वायत्तता
मिळाली तेव्हा थोड्या गडबडीत हे काम झालं होतं. डॉ. वाय. वि. जोशी सर संचालक
झाल्यावर त्यांनी ह्यात बदल करण्यासाठी स्वतः प्रयत्न केले. माझ्या सुदैवाने मला
पण त्यांच्या बरोबर काम करायची संधी मिळाली. IIT Mumbai आणि BITS Pilani ह्या दोन संस्थांच्या अभ्यासक्रमाचा
संदर्भ घेऊन वालचंद मधे काही सुधारणा करता येइल का असा अभ्यास आम्ही केला.
त्यादरम्यान कै. श्री. अरुण काका फाटक(त्यांना स्वबळावर इंजिनिअरिंग उद्योग
उभारणीचा अनुभव होता. ) एकदा म्हणले होते कि कॉलेजने पण एखाद्या कारखान्यासारखा
विचार करायला हवा. येणारा विद्यार्थी कसा आहे, आपल्याला बाहेर कसा विद्यार्थी पाठवायचाय आणि मग त्यासाठी ४
वर्ष काय प्रक्रिया केली पाहिजे.
डॉ. वाय. वी. जोशी सरांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम
वर्षातल्या काही विद्यार्थ्यांची मतं जाणून घेऊन एक structure तयार केलं आणि २०११ मधे दुसऱ्या वर्षाला
असलेल्या तुकडी करता ते अमलात पण आणलं. २०१२ साली लगेच काही परदेशी लोकांच्या
मार्गदर्शनाखाली त्यात घाई गडबडीत बदल केले गेले. आणि हा पायंडा पुढे चालूच
राहिला. काही बदल केल्यावर त्याचे feedback मिळाले कि मग पुढचे बदल करायचे हि प्रक्रिया विसरली गेली.
दरवर्षी बदल होत राहिले. इतके कि २०१३ ते २०१९ ह्या ७ वर्षांमध्ये बाहेर पडलेल्या
प्रत्येक तुकडीसाठी वेगळे structure वापरले गेले. त्यात केलेले काही बदल तर हास्यास्पद होते.
उदाहरणार्थ Automobile Engineering सारख्या विषयाचे practical काढले गेले. दीड वर्ष ह्यासाठी भांडून मग वैतागून २०१७ नंतर
मी तो विषय शिकवायचा सोडून दिला. २०१८ मधे AICTE नेच काही मार्गदर्शक तत्व आखून दिली आणि
त्याप्रमाणे परत एकदा बदल चालू झाले. केलेले बदल यशस्वी होतात कि नाही हे
बघण्यासाठी लागणारा patience वालचंद मधल्या धुरिणांना देवाने द्यावा हि सदिच्छा ! विद्यार्थ्यांच्या पुढील
पिढीचे थोडे तरी भले होईल अशी आशा करून आजची कहाणी थांबवतो.
अर्थात मी आणि माझ्या सहकारी प्रयोगशील शिक्षकांनी हे सगळं
घडत असताना विद्यार्थ्यांना या राजकारणाची झळ कमीत कमी पोचू देण्यासाठी प्रयत्न
केले. पण काहीवेळा सुक्या बरोबर ओलंही जळतंच..इलाज नसतो. अर्थात वालचंद म्हणजे
फक्त राजकारण असंही नाही.. हे काँलेज खरंच छान आहे आणि येणारा विद्यार्थी पण.
म्हणून तर चांगल्या गुणवत्तेच्या विद्यार्थ्यांना पडद्याआडच्या राजकारणाची झळ बसू
नये असं मात्र वाट राहिलं कायम. आज या लेखाच्या शेवटी मुद्दाम सांगावं वाटतंय. कामाच्या
ठिकाणचे असे बरे,वाईट अनुभव
तुम्हा प्रत्येकाला आले असतील किंवा पुढे येत राहातीलच. मग ते शाळेत शिकवत असा,काँलेजात असा ,सरकारी नोकरीत किंवा अगदी IT company त. मतमतांतरे असणारंच..पण आपण त्याठिकाणी
का काम करतोय? ,ते काम कसं करतोय ?आणि आपल्या वाट्याला आलेल्या कामाप्रती आपला हेतू शुद्ध आहे का? हे महत्त्वाचे. कारण अनुभव आणि माणसं येत
जात रहातात. अनुभवातून स्वतः शिकायचं आणि माणसांना चांगल्या कामासाठी प्रवृत्त करत
रहायचं. शिक्षकाने हेच तर शिकवायचं असतं. तुम्हाला काय वाटतं?
अमर परांजपे

Sir ekdam surekh lekhan😃
ReplyDeleteNicely written and coved almost everything which goes in department and Subject distribution is total based politics especially for new faculty.
ReplyDeleteविध्यार्थ्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन वेळपत्रकाचा विषय तुम्ही छान हाताळला. वेळापत्रकासाठी तुम्ही बनवलेलली excel template अजूनही वालचंद मध्ये वापरली जाते, आणि बहुतेक ती आता department ची permanent template राहील. Subject allottment ची मिटिंग बंद खोलीत न करता सर्वांसमोर व्हावी यासाठी आपण केलेला बंड मजेशीर होता. त्यासाठी चव्हाण सरांनी समर्थन दिले, पण त्यामुळे त्यांना झालेला त्रास आठवून वाईट वाटते.
ReplyDeleteपण विद्यार्थ्यांचे नुकसान करणाऱ्या वृत्ती ठेचायला या पुढे तुम्ही वालचंद मध्ये नाही याची खन्त राहील.
Industrial visit बद्दल काही लिहिता आले तर जरूर upload करा. Goa visit चा तुम्ही पाठवलेला photo पाहून खूप छान वाटले. हुबळी, गोआ ची इंडस्ट्रियल visit मुलांनी memorable बनवली.
Agree patil sir
DeleteKhup surekh mandani aahe sir.. Chaan lihitay..
ReplyDeleteGround realities! Hope your experiences work as an eye-opener to others with such mentality.
ReplyDeleteMost genuine one! 2016 च्या मेकॅनिकल बॅच ने नक्कीच ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतलाय सर. (Specially, आडमुठे सर, अजित पाटील सर, जगताप सर, नाईक सर यांचे कौशल्य आणि त्यामुळेच त्यांची असलेली विद्यार्थीप्रियता)
ReplyDeleteI have seen the master of subjects including college..
ReplyDeleteAll teachers Ajit Patil sir, Admuthe sir, Naik sir and You were the Fantastic Four..
I would like to mention Admuthe sir specially.. He is so elegant and fluent in his teachings..
Thanks Evey one of you for guiding us through this Journey...
In our*
Deleteशिक्षकाने नेमके काय करायचे याचे उत्तम मार्गदर्शन मिळते असे मला वाटते
ReplyDeleteपोस्ट ग्रज्युएशन चे पन बरेच किस्से आहेत....!
ReplyDeleteSome people can't give more importance to ideas rather than seniority, age, position or power one holds. The way you cracked it is admirable...
ReplyDeleteAni सगळ्यात महत्त्वाचं आज A.P. Patil sir, Admuthe sir, Naik sir यांची entry झाली लेखमालेत😄🙌🙏...तुमचा group च भारी होता. 👌
Technical experts grp ...
DeleteHo😅👍
Deleteछानच अमर सर, पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
ReplyDeleteपुढचा भाग कधी?
ReplyDeleteपुढचा भाग कधी?
ReplyDeleteचांगले गुणवान विद्यार्थी वॉलचंदला प्राधान्य देतात म्हणून कंपन्या येतात, नोकर्या लागतात म्हणून नवे गुणवान विद्यार्थी येतात,
ReplyDeleteया चाकाला जुना momentum आहे म्हणून अनेक दोष लपतात
विषयाची ऑलॉटमेंट बद्दल तुम्हीची स्पष्टता तेंव्हा पण होती आणि आज पण आहे. तुमच्यामुळे आपल्या विभागात एक प्रकारचा समतोल होता.
ReplyDeleteजेंव्हा माझ्याकडून metallurgy subject काढून घेण्यात आला तेंव्हा मला जो मानसिक आधार तुम्ही आणि अजित पाटील यांनी दिला त्याचा मी सदैव आभारी आहे , नाहीतर मी आज कॉलज मध्ये नसतो. आणि किती विचित्र आहे पहा आता तुम्हीच कॉलेज मध्ये नाही आहात.
खूप काही चांगले बदल जेंव्हा तुम्ही वेळापत्रक करत होता तेंव्हा झाले. त्यावेळी पहिल्यांदाच metallurgy चे सगळे प्रॅक्टिकल batches माझ्याकडे होत्या. सरजी , exam cell मधील result चा किस्सा(पेढे देण्याचा ) आठवला तर लिहा फार मजेशीर आहे, आपण दोघांनी तो मुळामध्ये जाऊन शोधून काढला होता.
Teachers with best expertise, always helped us for understanding subject. Our 2015 batch was the luckiest batch which learned subjects from chavan sir, Patil sir, admuthe sir, paranjpe sir, naik sir. We are actually blessed with best part of mechanical dept. It was not just dept but family for us. Sir , I request you to write something about placement conflicts and how you and patil sir encouraged our batch to have healthy competition and way of life ahead.
ReplyDeleteमस्त ब्लॉग . वालचंद कॉलेज मध्ये नवीन पिढीतील शिक्षकांचे मनोगत . आता असे मनापासून शिकवणारे शिक्षक मिळणार नाहीत
ReplyDeleteLast lines philosophy was good
ReplyDeleteफारच परखडपणे लिहिला आहेस आणि ते आवश्यक पण आहे
ReplyDeleteकिती ते राजकारण, किमान शिक्षण क्षेत्रामध्ये तरी हे प्रकार व्हायला नकोत, .... या सगळ्या अनुभवामुळेच तुझं वालचंद सोडायच्या पारड्याच वजन कदाचित जास्त झालं असेल न अमर ??
ReplyDeleteराजकारण.......
ReplyDelete