पहिल्याच सेमिस्टर
मध्ये दोन वेगळे विषय शिकवण्याचा आलेला ताण हळूहळू कमी होत गेला. वर्गातली lectures
जास्तीत जास्त interactive
व्हायला लागली आणि
हे interaction वर्गाबाहेरही चालू राहिलं. त्याच सेमिस्टर मधे
एके दिवशी फायनल इयरचे काहीजण भेटायला आले. त्यांनी विचारलं की "सर,
तुम्ही TY
ला MQC
मधला interferometry
हा chapter
कुठल्या पुस्तकामधून
शिकवणार आहात?" मला नीटसं काही कळलं नाही. कारण तोपर्यंत माझं
हातावरचं पोट होतं . म्हणजे रोज त्या दिवशीच्या किंवा दुसर्या दिवशीच्या लेक्चरची
पूर्वतयारी करायची आणि जाऊन शिकवायचं. फार पुढची तयारी केलेली नव्हती. मग ती मुलचं
म्हणाली की नेहमीच्या textbook पेक्षा interferomtery चा chapter अमुक अमुक पुस्तकात जास्त चांगला दिलाय. एवढेच नाही तर लायब्ररीमधून त्यांनी ते पुस्तकही आणून दिलं.
विद्यार्थ्यांनी शिक्षकाला आणि indirectly ज्युनियर शिक्षकाला अशी मदत केल्याचे उदाहरण
विरळाच ना! नंतर मग मी पण त्याच chapter च्या सविस्तर छापील नोटस् तयार करून circulate
केल्या. Two
way resource sharing ची ही परंपरा मग
पुढे अशीच चालत राहिली. ई-बुक आणि सॉफ्ट कॉपी चा जमाना चालू झाल्यावरसुद्धा ...
माझी एकुण दहा लायब्ररी कार्ड मुलांनीच जास्ती वापरली.
पुढच्या semester पासून मग जरा आवाक्यातले विषय मिळायला लागले. सुरुवात झाली ती Machine Design आणि Automobile Engineering पासून. प्रत्येक विषय शिकवताना आधी स्वतःच्या नोट्स तयार करायच्या आणि वर्गात शिकवताना पुस्तक घेऊन जायचं नाही. त्याऐवजी स्वतः काढलेल्या नोट्स घेऊन जायच्या असा शिरस्ता पाडला होता. सुट्या कागदांवर नोट्स काढून फाईलला लावायला सुरुवात केली. नंतर परत काही वेगळा मुद्दा कळला तर भर घालायला सोपं जायचं. प्रत्येक विषयाची एक अशा खूप files तयार होत गेल्या.
पहिल्यांदा Machine Designs शिकवताना एक गंमत घडली. पुस्तकातली examples वर्गात घ्यायची नाहीत असं ठरवल्यामुळे मी स्वतः प्रॉब्लेम तयार करायचो आणि प्रॉब्लेमला धरून अनेक मुद्दे चर्चेला येतील असा प्रयत्न करायचो. Design of shaft शिकवताना वेगवेगळ्या design attributes चा विचार करत गेलं की डिझाईन कसं बदलत जातं हे पण विद्यार्थ्यांना समजावं म्हणून मी एकच basic example घेऊन त्यात data ची भर घालत असायचो. strength, rigidity, torsional rigidity , deflection वगैरे मुळे diameter कसा बदलतो हे दाखवून देत होतो. बऱ्याच मुलांना ते आवडतंय, समजतंय हे जाणवत होतं...पण पण काहींच्या बाबतीत झालं उलटंच "अख्ख्या chapter मध्ये सरांनी फक्त एकच example शिकवलं " असा feedback आला. तुमचं नुसतं शिकवणं मुलांपर्यंत पोहचून चालत नाही तर त्यामागचा विचार / हेतू सुद्धा नीट पोहोचायला हवा. ते सुद्धा समोरच्याला नीट कळेल अशा पद्धतीने. हे माझं शिक्षण त्या feedback ने झालं.
वर्षाच्या शेवटी सर, तुम्ही MD-1( Machine Design) पेक्षा या गेल्या सेमचं MQC छान शिकवलंत अशी कमेंट आली. अर्थात मुलांप्रमाणे मी पण नवीन शिक्षक होतो. कसं शिकवायचं हेच तर शिकत होतो. त्यामुळे असे feedback मी खूप positively घेतले. खिलाडूवृत्तीने आशा comment स्वीकारणे आणि योग्य ते बदल करणे हे हळूहळू जमायला लागलं होतं. त्यावेळी मात्र जीव तोडून शिकवलेला 'माझा' असलेला Machine Design विषय सोडून मीच चाचपडत, अभ्यास करत शिकवलेला MCQ हा विषय छान शिकवलात हे वाचून थोडं हताश व्हायला झालेलं. तुम्ही ठरवता, करता एक आणि समोरच्या विद्यार्थ्यांना ते काय आणि कसं वाटेल याचा अंदाज बांधणं कठीण असतं. पण आपण करत राहायचं, कारण शिकवायला आवडतंय आपल्याला. हेच सूत्र पक्कं होतं माझ्या डोक्यात.
प्रत्येक सेमिस्टरमध्ये नवीनच विषय शिकवायला मिळण्याचे चक्र पहिली दोन वर्षे तरी चालूच राहीलं. त्यावेळी ह्या प्रकाराचा राग यायचा .पण अनेक वेगळ्या विषयांची तयारी या निमित्ताने झाली. कुठलाही नवीन विषय आपण शिकवू शकतो हा आत्मविश्वास मिळाला. माझे एक सहकारी तर गमतीने म्हणायचे सुद्धा की "अगदी डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग किंवा मायक्रो कंट्रोलर वगैरे विषय पण आता मी शिकवू शकतो."
हळूहळू तोच विषय दुसऱ्यांदा- तिसऱ्यांदा शिकवायला मिळायला लागला. पहिल्यांदाच तशी वेळ आली अर्थातच मशीन डिझाईनवर .एकीकडे दरवेळी शिकवताना नव्याने अभ्यास व्हायचा आणि काही संकल्पना नव्याने कळायच्या. उदाहरणार्थ, डिझाईन मध्ये मला टाटा मोटर्समध्ये पडलेला एक प्रश्न – गाड्यांचे gear ratio नेहमी 4.09 , 2.56 , 1.37 असे विचित्र का असतात? (सरळ 4, 4.1, 2.5 असे का नसतात?) याचे उत्तर गिअर डिझाईन शिकवायला लागल्यावर, खरंतर दुसऱ्यांदा शिकवताना कळलं. अशी उत्तरं मिळाली की कधी एकदा ती वर्गात सांगतो असं व्हायचं. गमतीचा भाग असा की या प्रश्नाचे उत्तर TML (टाटा मोटर्स )मधल्या सुद्धा कोणी नीट देऊ शकलेलं नव्हतं. Theory आणि practical असं connect करता आलं कि शिकण्याचा आनंद मनापासून घेता येतो.
पुस्तकातील शिकलेलं खरंच पुढे उपयोगी पडतं का? नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत, मग पुस्तकातला अभ्यास करून काय उपयोग? असे प्रश्न समोरच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनात असायचे. मग अनेक topics शिकवताना टाटा मोटर्स मधले अनुभव कामाला यायचे. टाटामोटर्स मधे काम करताना पडलेले प्रश्न हे मी काँलेजमधे शिकताना पुस्तकात वाचलेल्या अमूक तमूक टाँपिकमधे होते, ते तेंव्हा वाचलेलं मी टाटात कसं apply केलं, कसं उपयोगात आणलं, पुस्तकातली कोणती concept आठवली आणि उपयोगी पडली ते सांगायचो. जे खरंच होतं. अशा अनुभवांची गोष्ट करून वर्गात सांगितली ती सगळ्यांना appreciate व्हायची.
तोच विषय परत शिकवताना आधीपेक्षा चांगल्या प्रकारे शिकवायचा असं वाटायचं. त्यासाठी नवीन नवीन प्रयोग करायला पण सुरुवात केली. अशा काही प्रयोगांची कथा परत कधीतरी.

अमर परांजपे.
Sir,it is very good and waiting for further blogs
ReplyDeleteलेखनाचा flow मस्त चालला आहे 👌.
ReplyDeleteआम्हाला वर्गात 'हे असंच का असतं ' असं विचारून बुचकळ्यात पाडणारे,कोण उत्तर देऊ शकतोय त्याला गर्दीतून हेरणारे, बरोब्बर त्याला पकडणारे परांजपे सर आठवले.😁
तुमची प्रॅक्टिकल घेण्याची पध्दत आत्ता पर्यंत पाहिलेल्या सगळ्या शिक्षकां पेक्षा खूप वेगळी असायची.. थेअरी n रिअल life कशी कनेक्ट होते याचा प्रत्येय मला फक्त तुमच्या प्रॅक्टिकला यायचा सर.. N कदाचित त्यामुळेच मी IC ची surprise oral मधून सुटलेले..
ReplyDeleteThanks for making our walchand journey special..
आणि विशेष सांगायचं म्हणजे अजून देखील म्हणजे सात वर्षा नंतर मी तीच पद्धत माझ्या विध्यार्थ्यांना शिकवताना अवलंबते . गेल्या जानेवारी महिन्यातलीच गोष्ट बेस्ट प्रॅक्टिकल परफॉर्मन्स साठी HOD नीं माझा नाव घेतल.पहिल्यांदा थोडी दबकालेच मी पण त्या नंतर त्यांनी सविस्तर सांगितलं कि २५ वर्षी अनुभवी क्लास थ्री स्टाफ च्या सांगण्या वरून त्यांनी माझी प्रात्यक्षिकांची स्वतःहून ऑबसेर्व्हशन केलेलेत आणि विभागाच्या सर्व १७ स्टाफ मेम्बर्सना शक्य झाल्यास या पद्धतीचा शिकवताना वापर करण्यास सांगितले..
अगदी दुसऱ्या क्षणी हेड च्या टेबलाशेजारी उभे राहून तुम्ही हसत होतात ..[07/05, 6:33 pm] Naj: तुम्हाला ऐकताना थोडा अतिशयोक्ती केल्या सारखीच वाटेल पण प्रत्येक अवघड कन्सेप्ट शिकवण्या आधी मला असं वाटत कि सर इथे असते तर त्यांनी कसं एक्सप्लिन केला असत असा विचार अजून मनात येतो. त्याच श्रेय मला तुमच्या पेक्षा स्वतःला घ्यायला आवडेल कि तुमचे lectures मी इतक्या बारकाईने ऐकलेत आणि त्याचा इतका प्रभाव अजूनही इतका ताजा आहे
[07/05, 6:39 pm] Naj: मी तुमच्या teaching method चा वापर करते याचा पुढचा प्रत्येय तेंव्हा आला जेंव्हा तुमच्या स्गप मधल्या guest lecture च्या फीडबॅक मद्ध्ये अशी कंमेंट वाचली कि सर तुमच्या सारखाच शिकवतात mam . त्यावर दुसऱ्या दिवशी मी वर्गात उत्तर दिले सर माझ्यासारख नाही तर मी सरांसारखं शिकवण्याचा प्रयत्न करते
मस्त वाटले वाचून
Deleteमस्त. अमर फार छान वाटतंय तुझा शिकवण्यावरचा विचार वाचून. विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया खूप मनापासून आहेत.
ReplyDeleteEagerly waiting for BAJA STARTUP
ReplyDeleteSir waiting for diploma students memories...baki teacher Varun author chi journey tumchya peksha amhi jast enjoy krtoy...
ReplyDeleteVery good Sir
ReplyDeleteEkdm chan teacher an writter ahat sir tumi
ReplyDeleteTumch writting pn tumchy lecture sarkhech ahe sir kadhich sampu naye ase vatt��
Can't wait to read next article!
ReplyDeleteNice reading Amar, the story flow is awesome..Very Captivating..
ReplyDeleteपोटावरच हात, हा हा हा. फारच भारी. चालू ठेव, भारी लिहीत आहेस
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteमस्त !! मस्तच अमर !! तू पेरता झालास, जे जे पेरलेलं आहेस विद्यार्थ्यांमधे, ते आता छान उगवणारच आहे . अमरच्या विद्यार्थ्यांनो, तुम्हीही असेच " पेरते व्हा " .. मेधा मावशी
ReplyDeleteSir, Mastach.. Waiting for next one..
ReplyDeleteखूप छान अमर... असाच लिहीत राहा
ReplyDeleteअमर, हे सगळं वाचून अस वाटतंय की मला पण तुझे क्लास अटेंड करायला मिळाले असते तर माजा आली असती, मी वालचंद मध्ये 1984 ते 1987 साली होते :०)
ReplyDeleteI could imagine myself sitting in class again!
ReplyDeleteमला अजिबातच अनुभव नाहीये पण खूप छान वाटतंय... comments वाचून जास्त भारी वाटतंय....
ReplyDelete